News34 chandrapur
बल्लारपूर - शहरातील श्रीराम वार्डातील रणदिवे यांच्या घरी बल्लारपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धाड मारली असता त्याठिकाणी लाखोंचा जुगार सुरू होता, याप्रकरणी 10 ते 15 आरोपींना अटक केली असल्याची माहिती आहे. Crime news
31 ऑक्टोम्बरला गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की श्रीराम वार्डात एकाच्या घरी लाखोंचा जुगार भरला असून त्याठिकाणी काही नामवंत 52 पत्त्यांचा जुगार खेळत होते.
गुन्हे शोध पथक प्रमुख गायकवाड यांच्या नेतृत्वात फिल्मी स्टाईलने रणदिवे यांच्या घरी धाड मारली, तिथे जवळपास 10 ते 15 लाख रुपयांची रोख रक्कम व नामवंत आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे. Gambling
वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.