News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - दिनांक १३|११|२०२२ रोजी माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणविस यांचे नेतृत्वाखाली चंद्रपुर जिल्हातील शेतकरी व मच्छीमार बांधवांचे तिन शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणविस यांची देवगीरी या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन चंद्रपुर जिल्हातील मच्छीमार बांधवांच्या समश्या तसेच वाघांचा व रानडुक्करांचा (wild boar) बंदोबस्त, मुल शहरातील बायपास रोडचे काम सुरू करून मालधक्काचे काम सुरू करणे व राजोली येथील तलावाच्या दुरस्ती करिता निधी मंजूर करणे बाबत निवेदन देण्यात आले. या संदर्भात लवकरच मुंबई येथे मंत्रालयात बैठक आयोजित करून सर्व विषय सोडविण्याचे आश्वासन दिले. राज्याचे उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन कर्त्याना दिले. याप्रसंगी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष अविनाश जगताप, माजी नगर सेवक महेंद्र करकाडे, गजानन वलकेवार, माजी नगरसेवक अनिल संतोषवार, दादाजी येरणे, सामाजिक कार्यकरते लोकनाथ नर्मलवार, भगवान ढोरे, विपीन भालेराव, गुड्डु हेडावू, साहील येनगंटिवार, विनोद सिडाम, आकाश पाटील मारकवार, मा ग्राम पंचायत सरपंच भिकारूजी शेन्डे,अविनाश वरगंटीवार, सेवानिवृत्त न्यायाधीश श्री. मेश्राम साहेब, कवडुजी कोल्हे,जितु टिंगुसले व अनेक मच्छीमार बांधव आणि पत्रकार मनिष रक्षमवार व सतिश आकुलवार उपस्थित होते.