News34 chandrapur
गोंडपीपरी - सुरजागड लोह खनिज प्रकल्पातून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे अनेक अपघात घडत निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे.
अश्या घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने काही उपाययोजना कराव्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे प्रशासनाला करण्यात आली आहे.
लोह खनिज प्रकल्पाची गोंडपीपरी मधून होणारी वाहतूक जीवघेणी ठरत आहे, आता तर या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे शेतकर्यांचे उभे पीक नष्ट होत आहे.
प्रशासनाने अवजड वाहतुकीला पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत अवजड वाहतुक सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत न करण्यात यावी, गोंडपीपरी येथील महत्वपूर्ण चौकात सीसीटीव्ही कॅमेरे सहित वेग नियंत्रक यंत्र ही बसविण्यात यावे. Vanchit bahujan aghadi chandrapur
सदर वाहतूक ही सुसाट होत असते यासाठी पोलीस व महामार्ग पोलिसांनी वाहन चालकाची तपासणी करावी, अनेकदा वाहन चालक मद्यपान करून वाहन चालवताना आढळले आहे, ज्यामुळे अनेक अपघात घडले. Surjagad iron ore
आलापल्ली मार्गे येणाऱ्या वाहतुकीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ व चंद्रपूर मार्गे येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय जवळ तपासणी नाका उभारून वाहनचालकांची तपासणी करीत योग्य कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली आहे.
सदर मागण्या 8 दिवसात सकारात्मक मार्गी न लावण्यात आल्या तर वंचित बहुजन आघाडी रस्ता रोको आंदोलन करीत अवजड वाहतूक होऊ देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे व तालुकाध्यक्ष प्रकाश तोहोगावकर यांनी दिला आहे.