News34 chandrapur
चंद्रपूर - अनेक आर्थिक भार सोसत नागरिक दुचाकी वाहन खरेदी करतात, जेणेकरून कुठेही फिरणे, काम सुलभ व जलद पध्दतीने व्हावे.
मात्र वाहन खरेदी करण्यासाठी कष्टाचे चीज केलेल्या नागरिकांची दुचाकी जेव्हा चोरी जाते तेव्हा तो मोठ्या आर्थिक संकटात सापडतो. Chandrapur Crime
दुचाकी चोरांना जेव्हा न्यायालय कायद्याने चपराक देत शिक्षा सुनवितात त्यावेळी एक चांगला संदेश समाजात जातो, असेच एक वर्ष 2017 मधील दुचाकी वाहन चोरी प्रकरणात घडले.
चंद्रपूर शहरातील भानापेठ प्रभागात सुशीला अपार्टमेंट मध्ये राहणारे किशोर कुरस्वानी यांची दुचाकी 1 नोव्हेंम्बर 2017 मध्ये अपार्टमेंट च्या पार्किंग मध्ये ठेवली होती. Court decision
2 नोव्हेंबर 2017 ला सकाळी दुचाकी वाहन क्रमांक MH34W8100 हे पार्किंग मध्ये दिसून आले नाही.
किशोर यांनी वाहनाचा परिसरात शोध घेतला मात्र त्यांना दुचाकी कुठेही आढळून आली नाही.
त्यांनी 3 नोव्हेंम्बरला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात वाहन चोरीची रीतसर तक्रार नोंदविली.
शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस नाईक व सध्या जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस हवलदार संजय आतकुलवार यांच्याकडे दुचाकी वाहन चोरीचा तपास देण्यात आला. Bike theft
साक्षीदार व पंचाचे जबाब नोंदवीत पंचनामा करण्यात आला, गोपनीय माहितीच्या आधारे वर्ष 2017 मधील चोरी गेलेले वाहन पठाणपूरा व्यायाम शाळेजवळ एका इसमाकडे आहे, माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्या इसमाची विचारपूस केली आधी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र त्यानंतर वाहन चोरी केली असल्याची कबुली दिली.
त्यानंतर सदर प्रकरणातील चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात आली.
मात्र तिथे आरोपी 21 वर्षीय भूषण संतोष आंबेकर यांनी सदर दुचाकी ही रुग्णालय परिसरातून चोरी केली असल्याची माहिती दिली, सोबतच आरोपीने पंचावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मात्र सरकारी वकील श्रीमती बनसोड यांनी सदर प्रकरणी जोरदार युक्तिवाद व संजय आतकुलवार यांच्या सबळ पुराव्याने आरोपी भूषण आंबेकर याला 1 वर्षाची शिक्षा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी चंद्रपूर, न्यायालय श्री उ.ब. काळपगार यांनी सुनावली आहे .
सदर शिक्षेचा निर्णय 9 नोव्हेंम्बर 2022 ला सुनावण्यात आला.
न्यायालयात पैरवी म्हणून पोलीस हवालदार संतोष घोणमोडे यांनी काम पाहिले.
चंद्रपुरात दुचाकी चोरी प्रकरणात आरोपीला तब्बल 1 वर्षाची शिक्षा झाल्याचा ऐतिहासिक निर्णय झाल्याची पहिलीच वेळ आहे.
हा एक निर्णय नसून दुचाकी चोरांना न्यायालयाने दिलेली चपराक आहे, गुन्हा कोणताही असो पोलीस व न्यायालय गुन्हेगाराला सोडत नाही हे या निर्णयावरून सिद्ध झाले आहे.
ServicesMobile App Development We depend on our technically sound skilled developers for the ability to 카지노사이트 understand your ideas and rework them into actuality. This error may be cleared by reloading the web page for continued looking out. Sorry for the inconvenience, appreciate your help in bettering the Game Search application. Games that bring the player-excitement of linked Multi-Level Progressives to the for-sale area.
उत्तर द्याहटवा