News34 chandrapur
चंद्रपुर - शासकीय वैद्यकीय रुग्णालय रामभरोसे असून रुग्णांना तात्काळ सेवा द्या अन्यथा रुग्णालयाला टाळे ठोकू असा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी दिला आहे. वॉर्ड नंबर 8 येथे 35 बेड असून एका नर्सच्या भरवशावर हा वॉर्ड सुरू आहे.
या वार्डात गडचांदूर येथील इस्माईल शेख हा रुग्ण भरती असून त्याला लिव्हरचा त्रास आहे.मात्र त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. तसेच याठिकाणी एकही डॉक्टर उपस्थित राहत नसून रुग्णांना ताटकळत ठेवल्या जात आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात रक्त तपासणी ची सोया नसून येथील डॉक्टर रुग्णांना बाहेर रक्त तपासणीसाठी पाठवत असून नागरिकांची लूट सुरू आहे.तसेच यात डॉक्टर व लॅब चालकाचे संगनमताने हा सर्व प्रकार सुरू आहे. तर अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्यानं संपूर्ण घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
VBA
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जबाबदारी अधिष्ठाता या नात्याने डाॅ. अरुण हुमणे यांची आहे. मात्र, त्यांचा कुठेही वचक जाणवला नाही.रुग्णभरती असलेल्या बहुतेक विभागालाही कोणीच वाली नसल्याचे दिसून आले.
Chandrapur civil hospital
जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ही अवस्था असताना याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचेही यावेळी निदर्शनास आले. या रुग्णालयातील अनेक विभागांना वालीच नाही. प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवितो. ही अवस्था येथे प्रकर्षाने जाणवली. रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत सुविधा निर्माण करून वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. मात्र आता याच रुग्णालयाचे धिंडवडे निघत असून संपूर्ण रुग्णालय रामभरोसे असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळं वॉर्ड नंबर 8 मध्ये तात्काळ पूर्णवेळ डॉक्टरांना नियुक्त करा आणि येथील रुग्णांना सोयीसुविधा द्या अशी मागणी वंचितचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी केली आहे.