News34 chandrapur
चंद्रपूर / चंद्रपुरातील महेश मेश्राम या युवकाचा क्रूर हत्या प्रकरणात 10 आरोपींना 4 दिवसांची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
7 नोव्हेंम्बरला दुर्गापूर येथे रात्री 10.30 वाजताच्या सुमारास भयावह हत्याकांड घडले. Chandrapur crime
महेश मेश्राम या 35 वर्षीय युवकांवर घोळक्याने हल्ला चढवीत बेदम मारहाण केली, त्यानंतर महेशला दगडाने ठेचले, त्यानंतर महेश हा हालचाल करीत असल्याचे आरोपींच्या निदर्शनास आले, त्यानंतर मात्र आरोपीनी क्रूरतेची सीमा गाठत महेशचे शीर धडावेगळे केले.
त्यानंतर महेशचे शीर पायाखाली तुडवीत दुर्गापूर मुख्य मार्गावर त्याच्या शिरा सोबत आरोपीनी फुटबॉल खेळला. Chandrapur brutally murder
हा सर्व प्रकार अनेकांनी आपल्या डोळ्यांनी बघितला, चंद्रपुरात जे आजपर्यंत घडले नाही असा गुन्हा 7 नोव्हेंम्बरच्या रात्री घडला. Mahesh meshram murder
महेश ची हत्या केल्यानंतर भागीरथी ठाकूर व शुभम मलीये या 2 मुख्य आरोपींना दुर्गापूर पोलिसांनी अटक केली. Chandrapur police
उर्वरित आरोपी अतुल मालाजी अलिवार, दीपक नरेंद्र खोब्रागडे, सिद्धार्थ आदेश बनसोड, संदेश सुरेश चोखाद्रे, सूरज दिलीप शहारे, साहेबराव उत्तम मलीये, अजय नानाजी दुपारे, प्रमोद रामलाल सूर्यवंशी हे वर्धा जिल्ह्यात पळून जात असताना स्थानिक गुन्हे शाखेने यांच्या मुसक्या आवळल्या.
सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, सर्वाना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.