News34 chandrapur
घुग्घुस : शहरात गेल्या अनेक दिवसापासून पट्टेदार वाघाचं मुक्त संचार असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. Tiger with cube
आंबेडकर व शिवनगर येथे काही दिवसांपूर्वी वाघाने गाईच्या वासरूचे शिकार केले होते.
तर कैलास नगर येथे अनेकांना वाघांने दर्शन दिल्याने वेकोली कर्मी, वाहतूकदार, शेतकरी यांना प्रचंड दहशतीत जगावे लागत आहे.
आज पहाटेच्या सुमारास अमराई वॉर्डातील वाहजुद्दीन हे 65 वर्षीय इसम प्रांतविधी करिता गेले असता भुस्खलनात रिकामी केलेल्या वस्तीच्या मध्य भागात वाघ सदृश्य आकृती दिसली समोर कुत्रा असल्याच्या गैरसमजाने ते जवळ गेले असता त्यांची भंबेरी उडाली ते तडक घरी परत आले व त्याबाबत आपल्या कुटुंबाला माहिती दिली.
त्यांच्या मुलाने देखील वडिलांना गैरसमज झाला असल्याचा समजून दुर्लक्ष केले.
मात्र वडिलांच्या आग्रहाने त्यांनी सदर भागाचे परीक्षण केले असता संपूर्ण परिसरात वाघांचे पायांचे पंजे (pugmark) दिसून आले.
सदर घटनास्थळी काँग्रेस नेते राजुरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दंतलवार,नुरुल सिद्दिकी, मोसीम शेख यांनी भेट दिली काँग्रेस अध्यक्ष रेड्डी यांनी सदर वाघांचे तातळीने बंदोबस्त करून नागरिकांना दहशतीतुन मुक्त करावे असे आवाहन केले.