News34 chandrapur (रमेश निषाद)
राजुरा - राजुरा पोलिस ठाणे हद्दीतून एक बजाज पल्सर गाडी 220 सीसी व हिरो होंडा कंपनीच्या दोन मोटर सायकल चोरीला गेल्या होत्या. राजुरा पोलिस या गाड्यांचा तपास लावण्यास यशस्वी ठरले असून याप्रकरणी एक तरुण आणि दुसऱ्या विधी संघर्ष बालकाला अटक केली आहे. Bike thief
राजुरा पोलिस ठाण्यात अप. क्र.540/2022 भादंवी कलम 379 अन्वये बजाज पल्सर 220, किंमत रुपये एक लाख रुपये, तसेच अन्य गुन्ह्यातील दुसरी डीलक्स क्र. एमएच 34 सिए 1493 मोटार सायकल किमत 20 हजार आणि स्प्लेंडर प्लस क्र. एमएच 34 एसी 7030 किमत रुपये 20 हजार असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांच्या गाड्या चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी राजुरा ठाण्यात विविध गुन्हे नोंदवून तपास सुरू होता. Chandrapur crime आरोपींनी गाडीची नेमप्लेट काढून टाकलेली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुदर्शन सदाशिव पिंगे वय 20 राहणार सुमठाणा आणि एका मच्छी नाला, चंद्रपूर येथील अटक करून त्याच्या ताब्यातून या तिन्ही गाड्या हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई चंद्रपूर पोलिस अधिक्षक श्री.परदेसी यांचे आदेशान्वये राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संतोष दरेकर, सहायक फौंजदार खुशाल टेकाम, पोलीस हवालदार रवींद्र नक्कनवार, पोलीस हवालदार किशोर तुमराम, पोलीस शिपाई तिरुपती जाधव, रामराव बिंगेवाड यांनी केली.