News34 chandrapur
भंडारा - राजकुमारी ही 9 महिन्याची गरोदर होती, ती कपडे धुण्यासाठी तलावाजवळ गेली मात्र तिचा तोल गेल्याने ती तलावात बुडाली. Lake
ही हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात घडली, 30 वर्षीय राजकुमारी सुनील नेवारे नेहमीप्रमाणे हुतकाळा तलावाजवळ कपडे धुण्यासाठी गेली होती.
कपडे धुत असताना अचानक राजकुमारीचा तोल जात पाय घसरला, बचावासाठी राजकुमारी ने आरडाओरडा केला मात्र जवळपास कुणी नसल्याने मदतीला कुणी धावून आले नाही.
पाण्याची पातळी खोल असल्यामुळे राजकुमारी चा बुडून मृत्यू झाला. Sad news
राजकुमारी ची सासू शेळ्या चारून घरी आली असता तिने सुनेला आवाज दिला मात्र सून न दिसल्याने तिने शेजारी व गावात विचारपूस केली.
सुनेचा पत्ता लागत नसल्याने ती तलावाजवळ कपडे धुण्यासाठी गेली असल्याची माहिती सासूला मिळाली, सासू लगेच हुतकाळा तलावाजवळ गेली असता पाण्यात राजकुमारी ची साडी तरंगताना दिसली.
गावकऱ्यांनी पाण्यात उडी मारली तर काय? 9 महिन्याची गरोदर राजकुमारी चा मृतदेह बाहेर निघाला, राजकुमारी ला पाण्याबरोबर काढत करडी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
करडी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करीत शवविच्छेदन साठी मृतदेह तुमसर रुग्णालयात पाठविण्यात आला.
9 महिन्याची गरोदर अवस्थेत असलेल्या राजकुमारी चा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.