Rahul gandhi vs savarkar
दिनांक १८ नोव्हेंबर रोजी गांधी चौक चंद्रपूर येथे राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा चंद्रपूर महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चंद्रपूर महानगरच्या वतीने राहूल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्याबद्दल जाहीर निषेध सभा घेण्यात आली, यावेळी विशाल निंबाळकर बोलत होते. पुढे ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापीही सहन करणार नाही. यादरम्यान भाजपा पदाधिका-यांनी राहूल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. युवा मोर्चाच्या मंडळ अध्यक्षांनी राहूल गांधी यांच्या प्रतिमेस शाई लावून निषेध व्यक्त केला. भारतीय जनता युवती व महिला मोर्चाने सौ. छबूताई वैरागडे व जयश्री आत्राम यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करून माल्यार्पण करण्यात आले. यानंतर चंद्रपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार यांना निवेदन देवून राहूल गांधी यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजयुमोतर्फे करण्यात आली.
Rahul gandhi on savarkar
यावेळी भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्यासह भाजयुमो जिल्हा प्रभारी ब्रिजभूषण पाझारे, सौ. शिला चव्हाण, कुणाल गुंडावार, यश बांगडे, अजय सरकार, राहूल पाल, स्नेहीत लांजेवार, पप्पु बोपचे, मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडावार, संजय पटले, गजानन भोयर, हिमांशु गादेवार, स्वप्नील भोपये, सतीश तायडे, मयुर चहारे, सागर हांडे, प्रणय डंभारे, रघु गुंडला, रवि लोणकर, दिपक हूड, विपीन निंबाळकर, राकेश बोमनवार, मनोज उगेमुगे, राकेश टेंर्भुरकर, यश ठाकरे, सुभाष आदमने, श्याम बोबडे, शुभम सुलभेवार, सचिन गौरकार, मोहन मंचर्लावार, विपील यंगलवार, संतोष चन्नुवार, मयुर चव्हाण, राहूल जाधव, संतोष झॉ, इंद्रजीत सींग, श्याम पुंडे, विलास नवघरे, आदित्य ठाकरे, मनोज मोरे, अमोल चौधरी, अमन मुंधडा, रोहित पडाल, प्रथमेश विरूटकर, प्रदिप पटले, विलास माझी, अमर द्विवेदी, सागर दास, रोहीत शेट्टी, सुरज सरकार, राजेश सरकार, शंकर सरकार, सुजीत हलदार, अनिकेत भरणे, निरज बैरागी, महानंद बिश्वास, बिरेन बिस्वास, जय बिस्वास, विश्वजीत दास, अविनाश बिस्वास, प्रज्योत मेश्राम, अनिकेत गलबले, मुग्धा खांडे, पुनम पिसे, मिना निखारे, रंजना मोडक, रूबी शेख, भावना निकमवार, प्रिती लांडगे, रूपाली आंबटकर, चन्ना घोडमारे, अर्चना राऊत, वंदना सदभय्ये, लता सदभय्ये, गीता पोरटे, गिता कोरपे, वर्षा जगनाडे, जयश्री नेवलकर, प्रतिभा चौधरी, सिमा चौधरी, वंदना चौधरी यांची उपस्थिती होती.