News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
नागभिड - नागभीड अज्ञात चोरट्यांनी देशी दारूचे दुकान फोडून एक लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. यासंदर्भात नागभीड पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. Crime news
गुरुवारी सुलेझरी येथील आर.एस. वंजारी यांचे देशी दारू दुकान बंद करून दुकानातील व्यक्ती घरी गेले असता रात्री अज्ञात इसमांनी देशी दारू दुकानाच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. कपाटात व काउंटरमध्ये ठेवलेले ७५ हजार ४३० रुपये, १२ हजार रुपये किमतीचा जुना वापरता ऐंडराईड एलसीडी आणि २७ हजार १८० रुपये किमतीच्या ९ पेट्या देशी दारू असा एकूण एक लाख १५ हजार २४० रुपयांचा माल लंपास केला.याची तक्रार नागभीड पोलीस स्टेशन येथे दिली असुन सदर चा आरोपी अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम 457, 380 भा.द.वी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नागभिड पोलीस निरीक्षक मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. Chandrapur crime