News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील स्वच्छतेत नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावा यासाठी चंद्रपूर मनपाद्वारे शहर सौंदर्यीकरण लीग स्पर्धा अभियान सुरू केले.
स्वच्छतेचे महत्व काय? या सर्व बाबी नागरिकांना माहिती व्हाव्या यासाठी या स्वच्छता लीग अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील जटपूरा गेट प्रभाग क्रमांक 7 मधील जलनगर व रामाला तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. Ramala lake
रामाला तलावात मोठ्या प्रमाणात इकोर्निया वनस्पती व कचऱ्यात वाढ झाली असून ती स्वच्छ व्हावी हा उद्देश पुढे ठेवत श्री साईबाबा मित्र परिवार तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना स्वच्छता अभियान बघण्यासाठी बोलाविण्यात आले. Swachhta league
सदर स्वच्छता अभियान राकेश बोमनवार, माजी नगरसेविका छबु वैरागडे, संतोष झा, शंकर बकलवार, किसन पचारे, देवराव मचल्लावार, लक्ष्मण टोकला, शंकर गुमुलवार, प्रकाश कंपेलवार, श्याम तोकलवार, संजय तोकलवार व मत्स्यमार व साईबाबा मित्र परिवाराचे सदस्य यांच्या उपस्थितीत राबविण्यात आले.

