News34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यात सतत गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
अशीच एक घटना चंद्रपूर नांदगाव वेकोली क्षेत्रात घडली, wcl crime
16 नोव्हेंम्बरला रात्री 11.30 वाजताच्या सुमारास नांदगाव वेकोली क्षेत्रातील बारुद घराजवळ काहीतरी आवाज येत असल्याने महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मध्ये कार्यरत प्रशांत इंगळे यांनी त्याठिकाणी जाऊन बघितले असता 2 ते 3 जण भंगार चोरी करताना दिसले, इंगळे यांनी तात्काळ गस्तीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांना बोलाविले. Maharashtra security force

आता चोरी पकडली जाणार म्हणून चोरांनी तिथून पळ काढला, मात्र एका चोराला सुरक्षा रक्षकांनी पकडले. Chandrapur breaking news
त्याला पकडून सुरक्षा चौकीजवळ नेण्यात आले, त्यावेळी चोरांची विचारपूस करीत असताना चार ते पाच दुचाकीवर अनेक युवक तिथे आले व सुरक्षा रक्षक इंगळे यांना मारहाण करीत पळून गेले.
सुरक्षा रक्षकांनी तात्काळ शहर पोलिसांना याबाबत सूचना दिली.
दुसऱ्या दिवशी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला, सपोनि जयप्रकाश निर्मल यांनी वेकोली रुग्णालयात जाऊन जखमी प्रशांत इंगळे यांची भेट घेत, विचारपूस केली.
मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे झाले आहे.