News34 chandrapur
यवतमाळ/चंद्रपूर - रस्ते अपघातात चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील लांडगे दाम्पत्य ठार झाले, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Horrible accident
राष्ट्रीय महामार्ग 44 असलेल्या करंजी रोडवर 17 नोव्हेंम्बरला दुपारच्या सुमारास लांडगे दाम्पत्य आपल्या दुचाकीने MH34 BX6739 ने पांढरकवडा च्या दिशेने निघाले होते, मात्र त्याच्यामागून मृत्यू येत असल्याचे दोघांनाही जाणवले नाही.
मागून कानपुर वरून हैद्राबाद च्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक UP92 T3569 ने दुचाकीला जोरदार धडक देत चिरडले. Road accident
दुचाकी ट्रक मध्ये अडकली, रस्त्यावर रक्ताचा सडा सांडल्याने ट्रक चालकाने तिथुन पळ काढला, या अपघातात 55 वर्षीय गोकुलदास शामराव लांडगे यांचा जागीच मृत्यू झाला तर 45 वर्षीय सुनीता शामराव लांडगे या गंभीर जखमी झाल्या.
त्यांना गंभीर अवस्थेतरुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांनी आपला प्राण सोडला.
लांडगे दाम्पत्य चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर मधील वैशाली नगर येथे राहणारे होते.