News34 chandrapur
ब्रह्मपुरी - 3 महिन्यांपूर्वी पतीला यमसदनी पोहचविणाऱ्या पत्नीचे गूढ अखेर एका मोबाईल संभाषणामुळे उलगडले. Immoral relationship
सदर घटना ब्रह्मपुरी येथे उघडकीस आली असून या प्रकरणी मृतकाची पत्नी रंजना रामटेके व मुकेश त्रिवेदी यांना अटक करण्यात आली.
मृतक श्याम रामटेके यांच्या मुलीच्या तक्रारीनंतर ब्रह्मपुरी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले.
50 वर्षीय रंजना श्याम रामटेके व भाजीपाला व बांगडी चा व्यवसाय करणारे 48 वर्षीय मुकेश राजबहादूर त्रिवेदी या दोघांचे अनैतिक संबंध होते.
शहरातील आंबेडकर चौकात रंजना यांचे जनरल स्टोर्स चे दुकान असून तिथे मुकेश त्रिवेदी यांचे नेहमी येणे जाणे होते. Murder of husband
त्यामुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, मात्र दोघांच्या प्रेमात श्याम म्हणून उभे होते. श्याम चा काटा कसा काढायचा याबाबत दोघांनी एक योजना आखली.
6 ऑगस्ट 2022 ला रात्री श्याम रामटेके यांच्या चेहऱ्यावर उशी दाबून ठार मारले, त्यानंतर केलेले कृत्य मुकेश सोबत कथन केले, मुकेश ने रंजना ला
पुढे काय करायचे ते सर्व सांगितले.
सकाळी रंजना ने मुली व नातेवाईकांना पतीचे निधन हृदय विकाराच्या झटक्याने झाले असल्याची माहिती दिली. Chandrapur crime
नातेवाईक पोहचले, अंत्य संस्कारही करण्यात आला, मात्र श्याम ची हत्या झाली असे कुणालाही वाटले नव्हते.
मृतक श्याम रामटेके हे वनविभागात क्लर्क म्हणून सेवानिवृत्त झाले होते, काही दिवसानंतर रंजना यांच्या वागण्यात मुलींना फरक जाणवला, घरी मुकेश त्रिवेदी यांचे जाणे येणे वाढले, दोघांचे प्रेम प्रकरण मुलींच्या लक्षात आले, मुलींनी आईची समजूत काढली मात्र रंजना ला काही फरक पडला नाही.
घटनेच्या काही महिन्याआधी मुलीने आपला मोबाईल आईला वापरण्यास दिला होता, वडिलांचे निधन झाल्यावर 2 महिन्यांनी मुलगी घरी आली, त्या मोबाईलमध्ये मुलीने आपला सिमकार्ड टाकत वापरत होती, आईचा मोबाईल हाताळत असताना मुलीला मोबाईल मध्ये 6 ऑगस्ट मधील मुकेश आणि आईचे संभाषण दिसले, तिने ते संभाषण आपल्या मोबाईलमध्ये घेत ऐकले असता तिच्या पायाखालची जमीन सरकली.
त्या संभाषणात आईने वडिलांसोबत केलेले भयावह कृत्याचा संपूर्ण उल्लेख होता, वडिलांचे निधन झाले नसून त्यांची हत्या करण्यात आली होती.
मुलीने तात्काळ ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल करीत ते संभाषण पोलिसांना दिले.
पोलिसांनी मुकेश व रंजना यांना ताब्यात घेत चौकशी केली असता रंजना ने पतीच्या हत्येची कबुली दिली.
मृतक श्याम रामटेके हे अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने त्यांचा काटा काढण्यात आला, पुढील तपास पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.