News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर नगरपरिषदेच्या घुटकाला प्रभागात तब्बल 20 वर्षे नगरसेवक पद भूषविणारे 65 वर्षीय भास्कर बाबुराव मुधोळकर यांचं आज सायंकाळच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. Ex-munciple corporatorराष्ट्रवादी कांग्रेस पक्षात त्यांचा आधी सक्रिय सहभाग होता, त्यांनी घुटकाला प्रभागात अनेक विकासकामे केली होती.
वर्ष 1991 ते 2011 पर्यंत मुधोळकर हे चंद्रपूर नगरपरिषदेत नगरसेवक होते.
त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांमध्ये दुःखाच वातावरण पसरले आहे.
भास्कर मुधोळकर यांच्या पार्थिवावर 16 नोव्हेंम्बरला शांतिधाम येथे दुपारी 1 वाजता अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.