News34 chandrapur
चंद्रपूर - गरिबांची बुलेट ट्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदाफोर्ट-गोंदिया ट्रेन आज सकाळच्या सुमारास जंगल परिसरात अचानकपणे बंद पडली.
अचानक रेल्वे जंगलाच्या मध्यभागी बंद पडल्याने प्रवासी काही वेळासाठी घाबरले, मात्र काही वेळ निघून गेल्यावर सुद्धा रेल्वे एकाच जागी होती.
नागरिकांचा संयम सुटला व सर्व प्रवासी जंगलातून रेल्वे ट्रॅक ने पायदळ चांदाफोर्ट स्टेशनकडे निघाले.
सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, ग्रामीण भागात नोकरीवर असणारे नोकरदार सकाळी चांदाफोर्ट स्टेशनकडे निघाले. Chandafort gondiya railway
प्रवासी आल्यावर रेल्वे आपल्या नियोजित स्थळी जाण्यासाठी निघाली, रेल्वे 4 किलोमीटर दूर गेल्यावर अचानक केळझर आधी बंद पडली.
प्रवासी घाबरले मात्र रेल्वे लवकर सुरू होणार याची वाट बघू लागले मात्र रेल्वे सुरू न झाल्याने सर्व प्रवासी कडाक्याच्या थंडीत अवजड सामान सोबत घेत परत चांदाफोर्ट रेल्वे स्टेशनकडे निघाले.
विशेष म्हणजे चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वे अजूनही त्याठिकाणी थांबलेली आहे, नेमका बिघाड कसा झाला याची माहिती मिळू शकलेली नाही. Train stop
