News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद येथील कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमान करणारे विधान करून जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहे. त्याच्या निषेधार्थ तालुका काँग्रेसचा वतीने आज तहसील कार्यालय मुल समोर आंदोलन करण्यात आले. Governor koshyari
तात्काळ महाराष्ट्र राज्यातून राज्यपाल भगतसिंह कोषारी यांची हाकलण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.
महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यांची राज्यपाल या घटनात्मक पदाची धुरा सांभाळत असलेले भगतसिंग कोश्यारी यानी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यापूर्वी सुध्दा बेताल वक्तव्य व वादग्रस्त व्यक्तव्य करुन महाराष्ट्रृ राज्यातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा काम सातत्याने राज्यपाल कोषारी यांच्याकडून होत आहे. तथापी यापूढे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्यास म्हणून शिवप्रेमी म्हणून तालुका काँग्रेस कमिटी मुल कडून जसच्या तसं उत्तर देण्यात येईल. Congress protest
भगतसिंग कोश्यारी हे विकृत बुद्धीने वारंवार महापुरुषांचा अवमान करत आहे. त्यामूळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतीक अधिकार नाही. तरी त्यांनी आपला राजीनामा देऊन उत्तराखंडला जावे, असे बोलून दाखविले.
जाहीर निषेधाचे आयोजन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मान.नाना पटोले यांच्या निर्देशानुसार करण्यात आले असून काँग्रेस नेते माजी जी.प अध्यक्ष सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या मार्गदर्शनानुसार संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार,माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम येनुरकर, नवनियुक्त अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, माजी नगरसेवक विनोद कामडी, बाजार समितीचे माजी संचालक शांताराम कामडी, बेंबाळचे प्रशांत उराडे, ज्येष्ठ नेते बंडू गुरनुले,शहर उपाध्यक्ष कैलाश चलाख, संदीप मोहबे,सोसायटी संचालक विवेक मुत्यलवार,माजी न.प.उपाधक्ष चंदू चतारे ,अतुल गोवर्धन,अभिजित चेपूरवार,प्रवीण खानोरकर,रामू, विष्णू सादमवार, येलट्टीवार, रणजित आकुलवार, संतोष वाढई, यांचेसह तालुका, शहर,युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
