News34 chandrapur
रायगड - दाम्पत्याला बाळ झालं की प्रत्येक आई-वडिलांची हौस असते आपल्या बाळाचं नाव काही जगावेगळं असावं, मात्र राज्यातील एका कुटुंबाने आपल्या लेकीचं नाव शिवसेना ठेवलंय. Shivsena
राज्यात शिवसेना फुटली, मोठे बंड झाले मात्र यामध्ये काही कार्यकर्ते वेगवेगळ्या गटात गेले असून आजही बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ते शिवसेनेचा वारसा जपत आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड येथे वाडकर कुटुंबियाने आपल्या मुलीचं नाव शिवसेना ठेवलं.
17 नोव्हेंम्बरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिवस त्याचदिवशी वाडकर कुटुंबात लेकीचा जन्म झाला. Baby name shivsena
पांडुरंग वाडकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर कार्यकर्ते आहे, मराठी माणसावर होणारा अत्याचार व अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, ज्याप्रमाणे त्यांनी पक्षात एक-एक कार्यकर्ते जोडत त्यांना एक केले तसेच संस्कार चिमुकली शिवसेनेवर होणार आहे. Unique baby name
17 नोव्हेंम्बरला शिवसेनेचा नामकरण सोहळा वाडकर कुटुंबीयांनी मोठ्या थाटात साजरा केला.
