News34 chandrapur
नागपूर/चंद्रपूर - कोरोनामुळे गेली 2 वर्षे हिवाळी अधिवेशन रद्द झाले होते, यंदा हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबर पासून नागपुरात सुरू होणार आहे, विशेष म्हणजे सदर अधिवेशन हे 3 आठवडे चालण्याचे संकेत आहे. Nagpur Winter Session
प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 15 नोव्हेंम्बरला नागपूरच्या दौऱ्यावर येत आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोरोनामुळे सलग दोन वर्ष नागपुरात झाले नाही. यावर्षी सध्या तरी दोन आठवड्यांचे अधिवेशन कार्यक्रम निश्चित असला तरी हे कामकाज तीन आठवडे चालविण्यासाठी सत्ताधारी आग्रही आहेत. यासंबंधीची तयारी ठेवा अशा सूचना राज्य सरकारतर्फे अधिकाऱ्यांना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. Assembly session nagpur
या अधिवेशनासाठी विधानभवन परिसर, रविभवन, नागभवन, आमदार निवास इतर शासकीय इमारतींची देखभाल दुरुस्तीसोबत रंगरंगोटी करण्यात येणार आहे. साहजिकच यावर्षी अधिवेशनावर होणाऱ्या खर्चात वाढ अपेक्षित आहे. तूर्तास प्रशासनाने ९५ कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार केला आहे. नेहमीप्रमाणे यात वाढ होऊ शकते.