News34 chandrapur
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 29 ऑगस्ट 2022 ला घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेचा निकाल 4 नोव्हेंबर ला घोषित करण्यात आला आहे. Entrance exam
पूर्व परीक्षेतून मुख्य परिक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची cutoffs यादी आयोगाच्या https://mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Exam results
Exam results
पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांचा निकाल जाहीर झाला आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल, असं एमपीएससीनं आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.
Maharashtra Public Service Commission
आता पूर्व परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा 21, 22 आणि 23 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेतील पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात आलं आहे. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती आणि परीक्षा शुल्क दिलेल्या मुदतीत विहित पध्दतीनं सादर करणं आवश्यक आहे. अन्यथा त्या उमेदवाराला मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असं आयोगाच्या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे.