News34 chandrapur
पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता एका वर्षासाठी विनातारण कर्ज रु.१०,०००/- राष्ट्रीयकृत बँक मार्फत देण्यात येते. जे पथविक्रेते नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना बँकेकडून २० हजारांचे अतिरीक्त कर्ज उपलब्ध केले जाते.
योजनेअंतर्गत महानगरपालिकेतर्फे आतापर्यंत २२७८ पथविक्रेत्यांना १०,०००/- रुपये कर्जाचा लाभ मिळाला असुन यातील १०५८ लाभार्थ्यांनी कर्ज परत केले आहे. यापैकी २९८ लाभार्थ्यांनी २० हजार रुपयांचे अतिरिक्त कर्जाचा लाभ घेतला आहे. तर उर्वरित अतिरिक्त कर्जासाठी पात्र झाले आहेत. चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु आहे. शहरातील पथविक्रेत्यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्र (सेतू केद्र /नागरी सुविधा केंद्र) व ग्राहक सेवा केंद्र येथे ऑनलाईन अर्ज करावेत. तरी शहरातील पथविक्रेते यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपुर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक असलेले पथविक्रेते शहरवासीयांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. नियमित परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे. या उद्दिष्टांच्या आधारे पथविक्रेत्यांना अर्थसहाय्य करण्यास सदर योजना नवीन संधी उपलब्ध करीत आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय, कस्तुरबा रोड,ज्युबली शाळेजवळ येथे संपर्क करण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
चंद्रपूर - प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) (Pradhan Mantri Road Vendors Atmanirbhar Nidhi Yojana) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ २२७८ लाभार्थ्यांनी घेतला आहे. यातील २९८ लाभार्थ्यांनी कर्ज परत करून रुपये २० हजार कर्जाचा लाभ घेतला असुन इतर ७६० लाभार्थी २० हजार रुपये कर्जासाठी पात्र झाले आहेत. (Chandrapur municipal corporation)
३ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात आढावा बैठक आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. याप्रसंगी सहायक आयुक्त विद्या पाटील, रफिक शेख, वाहतुक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, प्रतीक देवतळे, सदानंद खत्री, डॉ. गोपाल मुंधडा, चंद्रपूर शहरातील पथविक्रेता संघटना यांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता एका वर्षासाठी विनातारण कर्ज रु.१०,०००/- राष्ट्रीयकृत बँक मार्फत देण्यात येते. जे पथविक्रेते नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना बँकेकडून २० हजारांचे अतिरीक्त कर्ज उपलब्ध केले जाते.