News34 chandrapur
बल्लारपूर - चंद्रपूर-बायपास मार्गावरील भिवकुंड नाल्याजवळील हनुमान मंदिरातील मूर्तीची अज्ञातांनी विटंबना केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
मात्र पोलीस प्रशासन तात्काळ त्याठिकाणी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली.
सदर कृत्य करणाऱ्या दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद, भाजप व गावातील नागरिकांनी केली आहे. VHP chandrapur
यावर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांना तात्काळ या प्रकरणाचा छडा लावत दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्याजवळ श्री हनुमान मुर्तीची काही समाज कंटकांनी तोडफोड केल्याप्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना सदर प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. Chandrapur breaking news
विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्याजवळ काही समाजकंटकांनी श्री हनुमान मुर्तीची विटंबना व तोडफोड केल्यामुळे विसापूर येथील गावामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. धार्मीक भावना दुखावल्याने नागरिक संतप्त झाले आहे. परिस्थीती चिघळू नये यादृष्टीने तातडीने पोलिस प्रशासनाने हस्तक्षेप करून परिस्थीती आटोक्यात आणावी व चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना दिले आहे.
