News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
तळोधी बा - तळोधी बा. अप्पर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोसेखुर्द कालवा व सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधकाम सुरू आहे. यासाठी रेतीची आवश्यकता असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी होत आहे.
Illegal sand traffic
Illegal sand traffic
अश्या माहिती आधारे तळोधीचे ठाणेदार दिनकर शेंडे यांनी मंगळवारी रात्रौ गस्ती सुरू असताना सावरगाव तळोधी मार्गाने रेतीची तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त केला. हा ट्रॅक्टर तळोधी बा. पोलीस ठाण्यात जमा केला. Sand mafia
ट्रक्टर व ट्रॉली ही विना नंबर प्लेट असून गाव परीसरातील एका रेती तस्करी करणाऱ्या व्यक्ती चा असल्याचे सांगितले जात आहे. तळोधी बा. पोलीस यांनी पंचनामा करून कारवाई करण्यात यावी यासाठी नागभीड तहसीलदार यांना रिपोर्ट सादर करन्यात आली आहे.
