News34 chandrapur
चंद्रपूर - आजच्या ऑनलाइन युगात कसलीही वस्तू घेण्यासाठी बाजारात जायची गरज नाही, सर्व आता ऑनलाइन झालं आहे. मात्र या ऑनलाइन युगात गुन्हेगारी ही अनेक पुढे गेली आहे.
असेच एक प्रकरण रामनगर पोलिसांनी उघडकीस आणले आहे. Online fraud
16 नोव्हेंबर 2021 ला चांदा क्लब ग्राउंड वरील मेला बघण्याकरिता गेलेले दुर्गापुरातील 22 वर्षीय राहुल जियालाल भांडेकर यांनी आपली दुचाकी वाहन क्रमांक MH34AT3714 हे पार्किंग मध्ये लावून गेले होते.
परत आल्यावर त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही, दुसऱ्या दिवशी भांडेकर यांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. Chandrapur crime
गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हे शोध पथकातील कर्मचारी हे बंगाली कॅम्प परिसरात पेट्रोलिंग करीत असताना संशयास्पद इसम 22 वर्षीय राहुलसिंग रमेश ठाकूर रा. बल्लारपूर याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने रामनगर पोलीस स्टेशन, बल्लारपूर व नागपूर शहरातील दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली.
विशेष म्हणजे चोरी केलेल्या दुचाकी आरोपीने OLX वर जाहिरात देत नागपूर येथे विकली.
वर्षभरात एक दिवस अचानक फिर्यादी भांडेकर यांच्या मोबाईलवर insurance policy renewal झाल्याचा संदेश आला.
त्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला असता सदर दुचाकी खरेदी करणाऱ्या इसमाच्या घरी पोलीस पोहचले व सदर चोरीची दुचाकी पोलिसांनी परत आणली.
विशेष म्हणजे आरोपी हा अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेला आहे, म्हणून त्याने हे या दुचाकी olx च्या माध्यमातून विक्री केली असल्याचे सांगितले.
आरोपी राहुल ठाकूर यांच्याकडून बजाज discover mh34 at3714, hero passion mh34as2821, hero splender mh31 db6054 या दुचाकी एकूण किंमत 70 हजार रुपये जप्त करण्यात आली.
सदरची कारवाई गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी मधुकर सामलवार व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.
यावेळी पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी चंद्रपुरातील नागरिकांना महत्वाचे आवाहन केले की ऑनलाइन olx वरून सामान घ्यायचे असल्यास कागदपत्रांची पूर्ण पडताळणी करून घ्यावे, व आपली फसवणूक टाळावी.