News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल :- येथिल श्री मॉ दुर्गा सेवा समिती तर्फे आणि योग नृत्य परिवार,चंद्रपूर यांच्या सहकार्याने मूल मध्ये निःशुल्क योग नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.नृत्य शिबिर दुर्गा मंदिराच्या भव्य प्रांगणात 19 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. Yog nritya
सकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. ‘नृत्य हो साथ, तो स्वस्थ रहे आप‘ असा शिबिराचा मुख्य उददेश आहे. योग नृत्य शिबिराचे मुख्य आयोजक श्री मॉ दुर्गा मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत असून मार्गदर्शक चंद्रपूर येथिल योग नृत्य परिवाराचे संस्थापक गोपालजी मुंदडा हे राहणार आहे. शारीरिक तंदुरूस्ती साठी मानवी जीवनात व्यायाम आणि योगाला फार महत्व आहे.यासाठी प्रत्येकांनी योग आणि व्यायामाला वेळ देणे आवश्यक आहे.योग नृत्य शिबिरात सुक्ष्म व्यायाम,अॅक्युप्रेशर,जॉगिंग,हास्यासन,जीम,अऑल स्पोर्टस,स्वीमींग,संपूर्ण व्यायाम, अॅक्टीव्हिटीज, डॉन्स,गरबा,अॅरोबिक्स आणि संगीतमय वातावरणातील योग इत्यादी प्रकारांची माहिती देण्यात येणार आहे. मोटापा,डायबिटीज,बिपी,अस्थमा,दमा,कमर आणि पायाचे दुखणे,मायग्रेन ,मानसिक तनाव, थायराईड, कोलेस्टाल,बॅकपेन,पोटाचे विकार,अॅसिडिटी आदी रोगांवर योग नृत्य लाभदायक ठरणार असून यातून मानवाची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यात मदत होणार आहे. योग नृत्याचे फायदे यावेळी उपस्थितांना सांगण्यात येणार आहे. शिबिरामध्ये येताना शिबिरार्थिनी स्पोर्ट जोडे,पांढरा रंगाचे कपडे लावून यायचे आहे.सोबत एक वही, पेन, नॅपकीन, पिण्याच्या पाण्याची बॉटल सोबत ठेवावी लागणार आहे.योग नृत्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन योग नृत्य शिबिर संयोजन समितीचे संजय पडोळे,गुरू गुरनूले,रूपलसिंह रावत,सुनिल मंगर आणि सहकारी सदस्यवृदांनी केले आहे.