News34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, यामध्ये चोरी, हत्या यांचा समावेश आहे.
चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथे 8 ऑक्टोम्बरला 67 वर्षीय बाबूलाल तुळशीराम मेश्राम हे पत्नीसह डोळ्यांचे ऑपरेशन करण्याकरिता गोंदिया येथे गेले होते.
त्या दरम्यान मेश्राम यांच्या घरी अज्ञातांनी लॉक तोडत प्रवेश करीत, घरी कपाटात असलेले सोन्याचे दागिने असा एकूण 66 हजार रुपयांचा ऐवज लांबविला.
याबाबत 1 नोव्हेंम्बरला मेश्राम यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार दिली, तक्रारीची दखल घेत गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि हर्षल एकरे यांनी आरोपीचा शोध घेत अष्टभुजा वार्डातील 23 वर्षीय हर्षद उर्फ सेक्सी कालिदास मेश्राम ला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने सदर घरफोडी केली असल्याची कबुली दिली.
आरोपिकडून 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी मधुकर सामलवार किशोर वैरागडे, विनोद यादव, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, निलेश मुडे, लालू यादव, विकास जुमनाके, सतीश अवथरे, हिरालाल गुप्ता, भावना रामटेके यांनी केली.