News34 chandrapur
चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्त्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेचा सध्या महाराष्ट्रातून प्रवास सुरू आहे. चंद्रपूर शहर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उद्या १५ नोव्हेंबरला वाशीम येथून यात्रेत सहभागी होणार आहेत. सोमवारी (ता. १४) चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्त्वात शेकडो कार्यकर्ते रवाना झाले आहेत. Bharat jodo yatra
भारत जोडो यात्रेच्या नियोजनासंदर्भात खासदार मुकुलजी वासनिक जिल्ह्यात आले होते. त्यानंतर चंद्रपूर शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, सर्वसामान्य नागरिकांना वाशीम जिल्ह्यातून सहभागी होता येणार असल्याचे सांगितले होते. तसेच या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात जनजागृतीसाठी प्रचार वाहन शहरात फिरविण्यात आले. कस्तुरबा चौकात एलईडी स्क्रीनवर यात्रेविषयी चंद्रपूरकरांना नियमित माहिती देण्यात आली. तसेच खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या उपस्थितीत मशाल रॅली काढण्यात आली. तसेच वाहन रॅली काढून वातावरण निर्मिती करण्यात आली. खासदार बाळूभाऊ धानोरकर या रॅलीत सहभागी झाले होते. Congress chandrapur
त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेता के. के. सिंग, प्रोफेशनल काँग्रेसचे मनीष तिवारी, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, माजी जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, अनुसूचित जाती विभागाच्या अश्विनी खोबरागडे यांच्या उपस्थितीत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून चंद्रपूर शहर जिल्हा कार्यालयातून वाहनाने कार्यकर्ते वाशीमच्या दिशेने रवाना झाले.