News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर मनपा हद्दीत मोठ्या गाजावाजात अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले मात्र अनेक वर्षांपासून ते काम अपूर्णच आहे.
अमृत च्या कंत्राटदाराला वाढीव रक्कम ही देण्यात आली, नागरिकांच्या घरी अमृत नळाचे कनेक्शन पोहचले, मात्र नळाला आजही पाणी नाही आले.
चंद्रपूर मनपात भाजपची सत्ता होती, कार्यकाळ संपण्याआधी पालिका पदाधिकाऱ्यांनी अमृत च्या नळाचे टेस्टिंग केले, नागरिकांना वाटले होते आता नळाला पाणी येणार मात्र तसे काही झाले नाही.
कार्यकाळ संपला आता मागील 6 महिन्यापासून पालिकेत प्रशासक बसला, तरीही अमृतचे काम अपूर्ण आहे. Chandrapur water crisis
बाबूपेठ भागात नागरिक आजही पाण्यासाठी वणवण फिरताना दिसतात, अमृत पाणी पुरवठा योजना लवकर कार्यान्वित करावी यासाठी चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे चंद्रपूर मनपा समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
बाबूपेठ येथे कष्टकरी कामगार नागरिक मोठ्या संख्येत राहतात, थकून भागून घरी आल्यावर त्यांना पाण्यासाठी बाहेर जावे लागते, नियमित पाणी कराचा भरणा केल्यावरही बाबूपेठवासी पाण्यापासून वंचित आहे.
सध्या शहरातील अनेक प्रभागात नल है पर जल नही अशी परिस्थिती आहे. Ncp protest
येत्या काही दिवसात अमृत पाणी पुरवठा सुरू करावी अन्यथा मनपा हद्दीतील सर्व प्रभागात राष्ट्रवादी कांग्रेस तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा देण्यात आला. Amrut water supply scheme
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेसच्या कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे, माजी नगरसेवक विनोद लभाने सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.