News34 chandrapur
कोल्हापूर - आधी टिकली लाव, मग मी बाईट देतो, या विधानामुळे पुन्हा एकदा संभाजी भिडे गुरुजी चर्चेत आले. Journalist
मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी भिडे गुरुजी आले होते, त्यावेळी साम टीव्हीच्या महिला पत्रकाराने भिडे गुरुजी यांचा बाईट घेण्याचा प्रयत्न केला, बाईट न देता त्यांनी प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,’ अशी प्रतिक्रिया दिली. Sambhaji bhide
या विधानानंतर भिडे गुरुजी यांच्या विरोधात अनेक संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या, महिला आयोगाने या बाबीची दखल घेत, संभाजी भिडे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी नोटीसही बजावले आहे.
भिडे गुरुजी यांच्या विधानाचा निषेध व महिलांची जाहीर रित्या माफी मागावी यासाठी महिला पत्रकारांनी निषेध आंदोलन केले.
कोल्हापुरातील महिला पत्रकारांनी शनिवारी निदर्शने केली.दसरा चौक येथे आंदोलनावेळी टिकली लावणे हा प्रत्येक महिलेची वैयक्तिक गोष्ट आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी महिलांची माफी मागून विधान मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली.
भिडे गुरुजींचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. क्रांतीसिहच्या संपादिका सुनंदा मोरे, श्रद्धा जोगळेकर,शुभांगी तावरे, अश्विनी खोंद्रे, सीमा पवार, दीक्षा घोरपडे, अर्पणा माने, कल्याणी अमनगी, अर्चना बनगे, क्षनिक्षा धनवडे आदी उपस्थित होत्या.
