News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील आकाशवाणी परिसरात 5 नोव्हेंम्बरला घराच्या बांधकामाची सेन्टरिंग खोलत असताना मजूर खाली पडला, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. Accident
मृतक कामगार हा घुटकाला निवासी 40 वर्षीय संतोष बोबडे असल्याची माहिती मिळाली आहे. Slab centring
कृष्णनगर येथील कंत्राटदार विलास आलेवार यांच्याकडे संतोष मागील 6 वर्षांपासून काम करीत होता.
नेहमीप्रमाणे 5 नोव्हेंम्बरला संतोष कामावर गेला मात्र तो परत आलाच नाही, सकाळी स्लॅब ची सेन्टरिंग काढत असताना त्याचा तोल जात तो खाली पडला, संतोष च्या डोक्यावर गंभीर जखम झाली, त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला. Labor die
अचानक घडलेल्या या घटनेमुळे कंत्राटदाराने तात्काळ बोबडे कुटुंबाला आर्थिक मदत दिली, मृतकाच्या पत्नीने रामनगर पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद केली. Contractor
बांधकाम मजूर संतोष बोबडे ह्याला सुरक्षेची साधने कंत्राटदाराने उपलब्ध करून दिली असती तर आज संतोष चा मृत्यू झाला नसता, चंद्रपुरात असे अनेक कंत्राटदार आहे जे कामगारांना राम भरोसे काम करायला सांगतात, अश्या बेजबाबदार कंत्राटदारावर कारवाई संबंधित प्रशासनाने करायला हवी.
