News34 chandrapur
चंद्रपूर - 27 सप्टेंबर 2022 ला तुकुम निवासी 35 वर्षीय महेश गड्डमवार यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली की शास्त्रीनगर, LIC ऑफिस जवळील HDFC बँकेच्या ATM पुढे दुचाकी लावून गेला असता काही वेळात काम पूर्ण करून महेश परत आला मात्र त्याठिकाणी दुचाकी वाहन आढळले नाही. chandrapur crime news
दुचाकींचा सर्वत्र शोध घेतला त्यानंतर याबाबत रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली.
स्थानिक गुन्हे शोध पथकाने तपासाला सुरुवात केली, त्यानंतर मुखबिराने दिलेल्या माहितीवरून महेशनगर तुकुम येथील महेशकुमार आडदा याला अटक करून चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली.
गड्डमवार यांची दुचाकी हिरो होंडा क्रमांक MH34BW1474 व हिरो पॅशन दुचाकी MH34J6214 असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur police
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद सिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, विनोद यादव, किशोर वैरागडे, आनंद खरात, चिकाटे, निलेश मुडे, सतीश अवथरे, लालू यादव, विकास जुमनाके, संदीप कामडी, विकास जाधव व हिरालाल गुप्ता यांनी केली.
