News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो त्यासोबतच प्रदूषित जिल्हा म्हणून सुद्धा चंद्रपूरची ओळख आहे.
मात्र हे सोन उत्पादन करणाऱ्या कामगार कुटुंबियांना नरकयातना सोसाव्या लागत आहे, शहरातील लालपेठ क्रमांक 2 मध्ये अनेक महिन्यापासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.
याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या मात्र वेकोली प्रशासन त्यांच्या मागणीकडे डोळेझाक करीत आहे.
असं नाही की वेकोली नागरिकांसाठी काम करते, त्यांनी नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी वेकोलीच्या अनेक भागात ऑरो मशीन लावल्या आहे, मात्र कित्येक ऑरो आज बंद पडले आहे, त्याकडे सुद्धा वेकोली प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
लालपेठ क्रमांक 2 मध्ये नागरिकांना कोळसायुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे, त्याच कारण म्हणजे ज्या भागातून हा पुरवठा होतो तो भाग अनेक महिन्यापासून स्वच्छ करण्यात आला नाही.
लालपेठ क्रमांक 2 मध्ये अनेक वेकोली कर्मचारी राहतात, त्यांची संख्या कमी असल्याचे कारण वेकोली त्यांच्या पुढे करीत आहे.
पण जे कामगार हजारो फूट खाली असलेले सोने बाहेर काढत वेकोलीला कोट्यवधी रुपयांचा फायदा करून देत आहे त्या कामगारांना वेकोली गढूळ पाणी पिण्यास भाग पाडत आहे.
विशेष म्हणजे वेकोली नागपूर मुख्यालयातील अधिकारी व कामगारांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी मिशन सेहत नावाची योजना वेकोली ने सुरू केली.
मिशन सेहत च्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च केल्या जात आहे तरीसुद्धा स्थानिक अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे कामगार वर्ग सुविधेपासून वंचित आहे.
दुर्गापूर उपक्षेत्रात पाणी व स्वच्छतेसारख्या सोयी उपलब्ध व्हाव्या या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनानंतर वेकोली ने नागरिकांना आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतले.
