News34 chandrapur
चंद्रपूर/शेगाव - चंद्रपूर जिल्ह्यात एकाच आठवड्यात 2 निर्घृण हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
दुर्गापुरातील हत्या प्रकरणी आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आले मात्र वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या हत्येने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. Chandrapur murder
10 नोव्हेंम्बरला शेगाव येथील चारगाव बु. येथील वनविभाग चेक नाक्याजवळील झुडपात एका अनोळखी व्यक्तीची दगडाने ठेचत हत्या करण्यात आली होती, पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र मृतदेहाची ओळख पटत नव्हती. Chandrapur local crime branch
गुन्ह्याचा शोध लवकर लागावा यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व शेगाव चे ठाणेदार मेश्राम हे घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस अधीक्षक परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग केला, आव्हानात्मक गुन्ह्यात सर्व कौशल्य वापरत बाळासाहेब खाडे यांनी मृतदेहाची ओळख पटविण्यास यश प्राप्त केले. Chandrapur police
मात्र हत्या कशामुळे झाली ही सुद्धा महत्वाची बाब होती.
यासाठी 2 पथक तयार करण्यात आले, एक पथक सपोनि जितेंद्र बोबडे यांच्या नेतृत्वात तर दुसरे पथक सपोनि मंगेश भोयर यांच्या नेतृत्वाखाली तयार करीत तपासकार्याला वेग आला. Challenging crime
सदर मृतक 60 वर्षीय तुळशीराम महाकुलकर रा. भेंडाळा येथील रहिवासी होता, त्याचं कुणाबरोबर वाद होता काय याचा शोध घेण्यात आला मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही.
2 दिवस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतोनात मेहनत करीत 2 संशयितांना ताब्यात घेतले यामध्ये 22 वर्षीय सौरभ प्रकाश हिवरे व 29 वर्षीय अतुल मधुकर मंडकाम दोघे राहणार जिल्हा वर्धा यांचा समावेश असून दोघे हल्ली चारगाव येथे मुक्कामी होते.
दोघांची चौकशी करण्यात आली आधी उडवाउडवीची उत्तरे मात्र त्यानंतर पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केल्यावर तुळशीराम ची हत्या केल्याची बाब कबूल केली.
हत्येचं कारण हादरविणारे
10 नोव्हेंम्बरला रात्री च्या सुमारास आरोपी सौरभ हा आपल्या दुचाकीने जात होता, अचानक सौरभ च्या दुचाकीमधील पेट्रोल संपले, निर्जन स्थळ जायचे कसे? म्हणत सौरभ ने दुचाकी त्या सुनसान मार्गावर पायदळ नेली, रात्रीचा वेळ सुनसान मार्ग, मात्र रस्त्याच्या कडेला मृतक तुळशीराम हा दारू पीत होता.
अंधारात सौरभ येत असल्याने मृतकाने त्याला शिवीगाळ केली, शिवीगाळ का केली म्हणून आरोपी व मृतकांमध्ये वाद झाला, त्यानंतर काही वेळात सौरभ आपल्या नियोजित ठिकाणी पोहचला, त्याने घडलेला हा सर्व प्रकार मित्र अतुल ला सांगितला.
दोघेही जंगलाच्या दिशेने निघाले मृतक तिथेच होता, तिघांमध्ये जोरदार वाद झाला, वादाचे रूपांतर मारहाणीत झाले.
आरोपीनी हातात दगड घेत तुळशीराम ला ठेचले.
यामध्ये तुळशीराम चा मृत्यू झाला, घडलेल्या प्रकारचा थांगपत्ता लागू नये यासाठी तुळशीराम चा मृतदेह झुडपात फेकला.
मात्र स्थानिक गुन्हे शाखेने आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणला.
दोन्ही आरोपींना शेगाव पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि मंगेश भोयर, धनराज करकाडे, संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, प्रकाश बलकी, नितीन साळवे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, चंदू नागरे, कुंदनसिंग बावरी, अमोल धांदरे, निराशा तितरे, प्रांजळ झिलपे यांनी केली.