News34 chandrapur
मुंबई - भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला, गुन्हा दाखल झाल्यावर आमदार आव्हाड चांगलेच संतप्त झाले, पोलिसांनी कसलीही शहानिशा न करता माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, न्यायाची लढाई मी लढणार मात्र हा गुन्हा दाखल होणे म्हणजे लोकशाहीची हत्या, मी आपल्या आमदारकीचा राजीनामा देतो अशी घोषणा आव्हाड यांनी केली. Mla jitendra awhad resignation
आव्हाड यांच्या घोषणेनंतर ठाणे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले, भाजपचा निषेध राष्ट्रवादी कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. Ncp
निव्वळ राजकीय आकसापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अनेकांनी म्हटले आहे. Jayant patil
भाजपची महिला पदाधिकारीमुख्यमंत्री शिंदे यांना भेटली त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
याचा अर्थ सर्वाना समजला आहे, आव्हाड यांना या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. molestation
आमदारकीचा राजीनामा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, त्यांचा राजीनामा पक्षाला मान्य नाही असेही पाटील यावेळी म्हणाले. Maharashtra politics
मुख्यमंत्री यांच्या समोर आव्हाड पुढे जात होते, हे त्यांच्या समक्ष घडले, सरकार पोलिसांचा गैरवापर करीत आहे. Jitendra awhad
गर्दीतून वाट काढत असताना हा प्रकार घडला तिथे विनयभंगाची कृती कुठे आहे असा प्रश्न पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.