News34 chandrapur
पश्चिम बंगाल - शासकीय योजनांच्या मोहिमेत अनेक चुका होत असतात मात्र त्या चुकीविरोधात आवाज उठविणारे कमी असतात. Viral video
असाच एक प्रसंग पश्चिम बंगाल मधील बांकुरा मधील व्यक्तीने रेशनकार्ड वरील नाव दुरुस्त करण्यासाठी तीनदा अर्ज केला होता, परंतु त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
मात्र त्यानंतर अर्ज स्वीकारला परंतु प्रशासनाने श्रीकांती दत्ता ऐवजी श्रीकांती कुत्ता असा चुकीचा बदल करण्यात आला. Men Barking Like Dog
या चुकीमुळे श्रीकांती दत्ता यांनी बीडीओ ला वाटेत पकडले व त्यांना काहीही न बोलता चक्क कुत्र्याच्या आवाजात इशारे करायला लागले.
सदर व्हिडीओ मध्ये दत्ता यांनी एकही शब्द न उच्चारता कुत्र्याच्या आवाजात त्यांना कागदपत्रे दाखवू लागले.
मात्र बीडीओ ने कागदपत्रे न बघता दुसऱ्याकडे सोपविले त्यानंतर मात्र दत्ता हे बीडीओ ला बघून भुंकायला लागले.
45 सेकंदाचा या व्हिडीओ मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त भुंकने दिसून येत आहे.
याबाबत दत्ता यांनी सांगितले की वारंवार शिधापत्रिकेवर नाव बदलविण्यासाठी अर्ज केला मात्र नावात अशी चूक केली की त्यामुळे माझे मानसिक संतुलन बिघडले.