News34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व भद्रावतीचे युगल ठेंगे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर ते भद्रावती येथे महामंडळ च्या एसटी ने प्रवास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसह चंद्रपूर परिवहन मंडळाच्या विभाग नियंत्रकांना घेराव करण्यात आला. Msrtc
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी एसटी उपलब्ध नसल्याने सायंकाळच्या एसटीचा वेळ ही जुळत नसल्याने विद्यालय सुटल्यांनंतर घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाचा वापर करावा लागत आहे, यामुळे रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी घरी पोहचत असून, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. अश्यात जर डेपो मधून नागपूर साठी जाणाऱ्या एसटी मध्ये विद्यार्थी बसले तर ड्राइवर व वाहकाकडून कडून विद्यार्थ्यांना एसटी मध्ये बसण्यास मनाई करीत शिव्या देऊन खाली उतरविल्या जाते अशी तक्रार यावेळी विद्यार्थ्यांनी केली. सदर बाब गंभीर असून यावर त्वरित कारवाई करण्यात यावी विद्यार्थ्यांचे नुकसान मनसे खपवून घेणार नाही. यावर त्वरित तोडगा निघाला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी दिला. Mns adhikrut
व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त एसटी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, मयूर मदनकर, करण नायर, कार्तिक खंगार,ऋषिकेश बालमवार,शुभम धुर्वे,अर्पित मांडवगडे,सूरज जुंघरे, सचिन वरखड़े,आकाश गोपेवार,प्रज्वल काकडे, साहिल वालदे, साहिल आसकर यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.