News34 chandrapur
मुंबई/अंधेरी - इमारतीचे शेड अवैध असल्याने ते पाडण्यासाठी गेलेल्या अभियंता यांनी कंपनी मालकाला तब्बल 50 लाखांच्या लाचेची मागणी केली मात्र फिर्यादी यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार करीत पालिकेचे कार्यकारी अभियंता सतीश पोवार यांना लाच घेताना रंगेहात ACB ने अटक करायला लावली. Bribe
मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यरत के/पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश पोवार यांनी एका कंपनीचे अनधिकृत शेड न तोडण्यासाठी कंपनी मालकाला 50 लाख रुपयांची लाच मागितली होती. Acb trap
पैसे देण्याची इच्छा नसल्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदविल्या गेली, तक्रारीची पडताळणी केल्यावर शुक्रवारी सापळा रचत पोवार यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
पुढील तपास ACB करीत आहे.