News34 chandrapur
मुंबई - म्हणतात न संकटात जो धावतो तोच खरा मित्र असतो, पण कधी काही मित्र आपल्या मित्रालाच संकटात टाकतात असाच एक प्रकार डोंबिवली येथे उघडकीस आला आहे. Crime news
डोंबिवलीत राहणारा एक तरुण कोल्हापुरातील इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत होता, वर्ष 2020 मध्ये आपल्या मित्रांसोबत तो तरुण एका फार्म हाऊसवर (farm house party) पार्टी करण्यासाठी गेला होता.
तेथे पिडीत तरुणाच्या मित्रांनी सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगींचे औषध टाकून त्याचे एका तरुणीसोबतचे अश्लील व्हिडीओ काढले. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल (video viral) करण्याचे धमकावले. पीडीत तरुणाला सातत्याने धमकावत त्याच्याकडून 30 लाख रुपये किंमतीचे आठशे ग्रॅम वजनाचे दागिने लाटले. Blackmail
ब्लॅकमेलिंग च्या त्रासाला कंटाळत पीडित तरुणाने याची तक्रार टिळकनगर पोलीस स्टेशनला दिली. Porn video's
पोलिसांनी या प्रकरणात सागर राजपूत या आरोपीला अटक केली असून त्याचे साथीदार अद्यापही फरार आहे.
या प्रकरणी अजून किती आरोपींचा सहभाग आहे याचा पुढील तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक कोल्हापूर ला रवाना झाले आहे.
आरोपी युवक व पीडित युवक यांच्या बयानात अनेक तफावत असून पोलीस दुसऱ्या बाजूनेही तपास करीत आहे.