News34 chandrapur
वरोरा : तालुक्यातील शेगाव (बु) येथे दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ ला संताजी मंदिर येथे ग्राहक पंचायतची शाखा स्थापन करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये शेगाव येथे नवीन कार्यकारणी स्थापन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. Consumer Protection Act 2019
सभेमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायती चे कार्य, ग्राहकांचे हक्क, अधिकार आणि ग्राहक संरक्षण कायदा 2019 याविषयी ग्राहक पंचायत, भद्रावती तालुका सहसचिव प्रविण चिमूरकर यांनी विस्तृत माहिती दिली. ग्राहक पंचायत भद्रावतीचे तालुका अध्यक्ष वामन नामपल्लीवार यांनी विविध छोट्या छोट्या उदाहरणाद्वारे अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे महत्व समजावून सांगितले. या बैठकीला अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर, जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते, भद्रावती तालुका अध्यक्ष वामन नामपल्लीवार, तालुका संघटक वसंत वर्हाटे, तालुका सचिव अशोक शेंडे, तालुका सहसचिव प्रवीण चिमूरकर आणि शेगाव (बु) येथील डॉ. प्रमोद बोंदगुलवार, विनोद चिकटे, रवींद्र साखरकर, सौ.मनीषा पटेल, ॲड. अजहर कुरेशी व आशिष कोटकर हे उपस्थित होते.