News34 chandrapur
मुंबई/वृत्तसेवा - वर्ग दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी महाराष्ट्र बोर्डाने दिली आहे, दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी बोर्डाने मुदतवाढ दिली आहे. Application form
यानुसार आता दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर असणार आहे आणि बारावी बोर्डासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर असणार आहे. बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे आवेदन पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ( SSC Board Exam)
विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत.
( HSC Board Exam )
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक याआधीच जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार, बारावी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 20 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. Important news तर दहावी बोर्ड परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. हे संभाव्य वेळापत्रक असून बोर्डाकडून निश्चित वेळापत्रक येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. Maharashtra exam board