News34 chandrapur
पंजाब - शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर अज्ञाताने गोळीबार केला, या गोळीबारात सुरी यांचा मृत्यू झाला. Sudhir soori
पंजाबमधील अमृतसर येथे गोपाळ मंदिराच्या बाहेर कचऱ्यात देवांच्या मुर्ती सापडल्या होत्या. यावरून मंदिराच्या बाहेर सुधीर सुरी आंदोलनाला बसले होते. तेव्हाच गर्दीतून आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. Shivsena leader
प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून सुरी यांची ओळख होती मात्र महाराष्ट्र मधील शिवसेनेशी त्यांचा कसलाही संबंध नाही. hindu leader
गोपाल मंदिरच्या बाहेर कचऱ्यात देवाच्या मूर्त्या सापडल्याने त्याचा निषेधार्थ सुधीर सूरी यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. यावेळी कुणी तरी त्यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे सूरी जागीच कोसळले. Sudhir suri shot dead
गंभीर अवस्थेत असलेल्या सूरी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. Amrutsar firing news
सुधीर सुरी यांच्यावर दोघांनी हल्ला केला होता त्यामधील एकाला पोलिसांनी अटक केली आहे, आरोपीचे नाव संदीप असल्याची माहिती असून त्याने लायसेन्सि बंदुकीने गोळीबार केला असल्याची कबुली दिली असून बंदूक पोलिसांनी जप्त केली.