News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील अंचलेश्वर वार्डातील रहिवासी प्रशांत मूलकेवार यांनी 17 ऑक्टोम्बरला राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवली, ज्यामध्ये त्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. causing suicide
मात्र यावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत प्रकरण थंडबसत्यात ठेवले.
प्रशांत मूलकेवार हे शहरातील खत्री प्लॅस्टिक मध्ये कामाला होते, प्रशांत ची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने खत्री प्लॅस्टिक चे संचालक संजय खत्री यांनी रोजच्या बिजनेस मध्ये 0.5 टक्के कमिशन व पगार देतो असे प्रलोभन देत त्याला कामावर ठेवले होते. Chandrapur suicide case
मात्र आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी प्रशांत ला लोन हवे होते, ते लवकर मिळवून देतो असे आश्वासन सुद्धा संजय खत्री यांनी मृतक प्रशांत ला दिले होते, मात्र ते आश्वासन पूर्ण झालेच नाही.
एकही काम व्यवस्थित होत नसल्याने प्रशांत ला मानसिक धक्का पोहचला, दुकानाचे मालक सुद्धा त्याला शिवीगाळी करीत उद्धट बोलत होते.
संसाराचा गाळा चालवायचा कसा हा प्रश्न प्रशांत समोर उभा होता, त्यामुळे प्रशांत यांनी माझ्या आत्महत्येला पूर्णपणे संजय खत्री जबाबदार आहे असे सुसाईड नोट मध्ये उल्लेख करून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली, सुसाईड नोट मध्ये स्पष्ट खत्री यांचे नाव लिहले होते तरीसुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, माझ्या पतीला न्याय द्या अशी मागणी भाग्यश्री प्रशांत मूलकेवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
मृतकाची पत्नी भाग्यश्री यांनी पुढे सांगितले की 2013 ते 2022 पर्यंत प्रशांत हे खत्री टॉय शॉप मध्ये काम करीत होते.
संजय खत्री हे माझ्या पतीस नेहमी अपशब्द वापरून बोलत होते, माझ्या पतीला लोन मिळवून देतो म्हणत मी स्वतः जामीनदार राहणार असे आश्वासन खत्री यांनी दिले होते.
खत्री यांचेवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मृतकाची पत्नी आपल्या लहान मुलाला सोबत घेत न्यायासाठी वणवण भटकत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांची भाग्यश्री यांनी याबाबत भेट घेतली त्यावेळी परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.