News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - सिंदेवाही शहरातील लोनवाही परिसरात मंगळवार दिनांक 15 नोव्हेबर ला सकाळी 6 वाजता दरम्यान लोनवाही विद्युत अंभियता यांच्या कार्यालय जवळच समोरून अस्वल व अस्वलाचा लहान पिल्लू हे कुषि उत्पन्न बाजार समिती चा आतील झाड झुडपामधुन निघुन गेले. Wild animal
पहाटे मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या- जाणाऱ्यां नागरीकांना दिसले असता लगेचच याची माहिती वनरक्षकाच्या साह्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला दिली असता. Wild bear
सिंदेवाही वनविभागाचे अधिकारी सालकर व हटवार यांनी कशाच्याही विलंब न करता आपल्याकडील पथक आर.आर.यु. हे पथक घटनास्थळी पाठवले, व स्वता हजर झाले असुन या मार्गावर वन विभागाने कॅमेरे सुद्धा लावले आहेत.
Avoid Morning walk
सध्या या मार्गावर वन्य प्राण्यांच्या मुक्त संचार दिसून आलेला आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांनी या मार्गाने सध्यातरी पहाटे मार्निंग वॉकला जाने येणे टाळावे असे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांनी सांगितलेले आहे.