News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल - मूल तालुक्यात पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असताना मौजा येरगाव येथील शेत शिवारात उमा नदीच्या काठावर मोठया प्रमाणात कोंबडा बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी अवैध कोंबडा बाजारावर धाड मारली, कोंबड्याची झुंज लावत पैश्याचा खेळ त्याठिकाणी सुरू होता. Crime news
दुपारच्या सुमारास मारलेल्या धाडीत पोलिसांनी दिलीप डोनूजी निकूरे वय ५२ वर्ष रा. चिमडा ता. मुल, जि. चंद्रपूर, पुनेश्वर कवडू नागोसे वय ५५ वर्ष रा. चितेगाव ता. मुल जि. चंद्रपूर, प्रमोद हरिशचंद्र गावतूरे वय ३८ वर्ष रा. हळदी ता. मुल जि. चंद्रपूर, सुधीर मधूकर मुनगंटीवार वय ३२ वर्ष रा. हळदी ता. मुल जि. चंद्रपूर, मारोती चरणदास पिंपळे वय २५ वर्ष रा. हळदी ता. मुल जि. चंद्रपूर, इश्वर पुरुषोत्तम कोठारे वय २६ वर्ष रा. हळदी ता. मुल जि. चंद्रपूर असे जुगार खेळताना मिळून आले. Chandrapur crime news
कारवाई दरम्यान पोलिसांनी ३ जखमी कोंबडे, नगदी २७००/- रू. ४ मोबाईल व ४ मोटार सायकल असा एकूण २,१५,४००/- रू चा माल जप्त केला. Police raid
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे, पो नि सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकते, पोअं श्रावण कुत्तरमारे, शफीक शेख, संजय जुगनाके, स्वप्नील खोब्रागडे यांनी केली आहे.
