News34 chandrapur
चंद्रपूर - नागपूर रोड वरिल शोरुम मधील विक्रीस असणारी चारचाकी वाहने दुचाकी वाहने ही दररोज नागपूर रोडवर भररस्त्यात शोरुम समोर उभी करतात. तसेच त्यांची वाहनांना खरेदी करणासाठी येणारी ग्राहक हे सुध्दा रोडवर आपली दुचाकी चारचाकी वाहने रोडवर लावतात. No Parking
त्यातुन रस्त्यावर वाहनामुळे वाहतुक कोंडी होवून अपघात होण्याची भिती वाढत आहे. व त्यामुळे जिवीतहानी होण्याची भिती निर्माण झाली आहे. हे अपघात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना पार्किंग साठी एकही ठिकाणी पार्किंग व्यवस्था नाही. व ते स्वतः त्यामुळे अपघातास आमंत्रण देत आहे. Illegal parking त्यावर आपण लवकरात लवकर कारवाई करून होणारी रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करावी व रस्ता मोकळा करून द्यावा. असे निवेदन अभिनव देशपांडे शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर यांचा नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, मनपा चंद्रपूर आयुक्त साहेब, वाहतूक निरीक्षक साहेब यांना देण्यात आले. Ncp youth congress
यावेळी केतन जोरगेवार शहर महासचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर, राहुल वाघ शहर महासचिव, पंकज मेंढे शहर सचिव,नदीम शेख प्रभाग अध्यक्ष आदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर कार्यकर्ते उपस्थित होते.
