News34 chandrapur
वर्धा - समुद्रपूर येथून जाणाऱ्या नागपूर-हैद्राबाद महामार्गावरील खंडाळा शेतशिवारात वाहनांची तपासणी करीत असताना ट्रक च्या धडकेत महामार्ग पोलीस शिपायाचा मृत्यू झाला.
वर्धा महामार्गावर आज ट्रक थांबवून वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी मोहीम सुरू होती, यावेळी ट्रक समोर पोलीस शिपाई गौरव खरवडे हे कागदपत्रांची तपासणी करीत होते. Highway police
त्यावेळी थांबलेल्या ट्रकला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने मागून जोरदार धडक दिली, यात ट्रक समोर उभे असलेले खरवडे यांना ट्रक ची जोरदार धडक बसली. Traffic police
खरवडे ट्रक च्या धडकेत गंभीर जखमी झाले होते, त्यांना तात्काळ समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी खरवडे यांना मृत घोषित केले, सदर घटनेमुळे पोलीस विभागात शोककळा पसरली. Accident police die
अपघातानंतर ट्रक दुभाजकावर चढला होता, यामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
समुद्रपूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
