News34 chandrapur
चंद्रपूर/नागपूर - कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे, आता काही दिवसात ही यात्रा महाराष्ट्र राज्यात येत आहे. सध्या ही यात्रा तेलंगणा राज्यात आहे. Bharat jodi yatra
मात्र त्या आधी कांग्रेसचे जेष्ठ नेते यांना या यात्रेदरम्यान दुखापत झाल्याची बाब पुढे आली आहे.
काँग्रेसचे नेते, माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत भारत जोडो यात्रेदरम्यान हैदराबादमध्ये झालेल्या गर्दीत खाली पडले. त्यांच्या उजव्या डोळ्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथील वासवी रुग्णालयात दाखल केले आहे. Congress nitin raut injured
माजी मंत्री नितीन राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील काही नेते या यात्रेत सहभागी झाले होते. काल नितीन राऊत यांना यात्रेदरम्यानच्या धावपळीत खाली पडले. यामध्ये ते जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती त्यांची मुलगी दीक्षा राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान माझे वडील बेशुद्ध झाले. त्यांच्या डोक्याला छोटीशी जखम झाली आहे. आशा आहे की ते लवकरच बरे होतील आणि महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा पोहोचल्यानंतर त्यामध्ये ते सहभागी होतील, असे तिने म्हटले आहे.