News34 chandrapur
चंद्रपूर - सरदार वल्लभभाई पटेल जयंती दिनानिमित्त देशात ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. Anti corruption department chandrapur
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर नागपूर परिक्षेत्र च्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाचे तालुकानिहाय आयोजन केले आहे. या सप्ताहामध्ये ‘भ्रष्टाचारमुक्त भारत, विकसित भारत’ ही संकल्पना घेऊन समाजाला प्रबोधन करून भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी आवाहन करणार आहेत. कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्यासाठी कोणी खासगी इसम शासकीय कामासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त पैशाची मागणी करीत असल्यास चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय किंवा पत्रकावर दिलेल्या मोबाईल क्रमांक व 1064 यावर सम्पर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी केले आहे. Vigilance Awareness Week

या सप्ताहानंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील विविध महाविद्यालयात, गर्दी असलेल्या ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे जनजागृती सप्ताहाच्या सुरुवातीलाच चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंत्याला 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
कुणीही आपल्याला लाच मागत असेल तर न घाबरता आमच्याशी सम्पर्क करा आम्ही आपल्या सेवेत सदैव तत्पर राहू अशी प्रतिक्रिया यावेळी शिल्पा भरडे यांनी दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जारी करण्यात आलेले पत्रक शासकीय कार्यालय परिसरातील नागरिकांमध्ये वितरित करण्यात आले.