News34 chandrapur
बल्लारपूर - शहरात 31 ऑक्टोम्बरला गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांनी श्रीराम वार्ड येथील निखिल रणदिवे यांच्या घरी धाड मारीत लाखोंचा जुगार पकडला. Gambeling
या जुगारात 5 लाख 84 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करीत 15 आरोपींना अटक करण्यात आली, यामध्ये बल्लारपूर, राजुरा व चंद्रपुरातील जुगार खेळाडूंचा समावेश होता. Chandrapur crime news
पण ते आरोपी कोण? त्यांचे नाव काय? यामध्ये बल्लारपूर पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली.
कारण आरोपी मध्ये अनेक राजकीय व व्यापारी वर्गातील जुगार बहाद्दरांचा समावेश असल्याची माहिती होती.
कारवाई करणारे गुन्हे शोध पथकाचे सपोनि गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता आरोपींचे नाव काय याबाबत विचारले असता त्यांनी सरळ सांगितले की आरोपींची संख्या जास्त आहे, त्यामुळे मला नाव लक्षात नाही, अधिक माहिती हवी असेल तर पोलीस निरीक्षक पाटील यांच्याशी संपर्क करा. Chandrapur police
त्यांनतर पोलीस निरीक्षक पाटील यांच्याशी संपर्क करण्यात आला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही, जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांना या प्रकरणाबाबत माहिती व आरोपींचे नाव गुप्त ठेवण्यात आले असल्याचे सांगितले असता त्यावेळी त्यांनी मी पोलीस निरीक्षक पाटील यांच्याशी चर्चा करतो त्यांनतर आपण आरोपींचे नाव त्यांच्याकडून घ्यावे. Devendra fadnavis
मात्र त्यांनतर सुद्धा पाटील यांनी मोबाईलवर प्रतिसाद दिलाच नाही, कारवाईच्या दुसऱ्या दिवशी आरोपींचे नाव काय? याबाबत कुणीही ब्र सुद्धा काढला नाही.
दिवसभर पोलीस निरीक्षक ते सपोनि गायकवाड हे एकमेकांशी सम्पर्क साधा असे सांगत होते काही वेळानंतर मोबाईलवर प्रतिसाद देणे बंद झाले.
विशेष म्हणजे पोलीस विभागाचा जनसंपर्क क्रमांक यावर सुद्धा प्रतिसाद मिळत नाही, पोलीस विभागाचा जनसंपर्क अधिकारी कोण हे ही कुणाला ठाऊक नाही.
आरोपींचे नाव लपविण्याची ही पहिली वेळ नाही याआधी सुद्धा असे प्रकार घडले आहे, मात्र राज्याचे वनमंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात लाखोंचा जुगार व आरोपीच्या नावांची लपवाछपवी चा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे.
मागील अनेक महिन्यापासून रणदिवे यांच्या घरी जुगार भरत होता तर याबाबत पोलिसांना माहिती नव्हती काय?
याआधी जुगाराचे अनेक प्रकरण पुढे आले मात्र त्याची रीतसर प्रसिद्धी पत्रक पोलीस विभागाने पाठविले या प्रकरणात असे काही झाले नाही हे मात्र विशेष.